महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारसभांमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा भरपावसात सभा झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी भरपावसात केलेले भाषण पुन्हा करिष्मा घडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात
भरपावसात शरद पवार यांची पुन्हा सभा
2019 मधील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची करून दिली आठवण
शरद पवार यांना पाऊस पुन्हा फळणार का?
हिवाळा सुरु झाला आहे. राज्यात थंडीची चाहुल लागली आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकांसाठी प्रचार रंगात असताना शरद पवारांच्या सभेवेळी पुन्हा पाऊस आला आहे. हिवाळ्याच्या दिवसांत पाऊस आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या पावसाने शरद पवारांच्या 2019 मधील पावसातील भाषणाची आठवण करून दिली आहे.
2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेची संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इंचलकरंजीत आज सभा पार पडली. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत. भर पावसातही त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.
शरद पवार यांचं संपूर्ण भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा-