Sharad Pawar Press Conference : या लोकसभा निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मर्यादित जागा लढवल्या. सर्व मिळून आम्ही दहा जागा लढवल्या. अजून मतमोजणी झाली नाही. पण सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. हे यश पक्षाचं मानत नाही. महाविकास आघाडी, विशेषत: काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली. आम्हाला जसं यश मिळालं, तसं काँग्रेसला सुद्धा मिळालं. आजचा निकाल विधानसभेसाठी प्रेरणादायी आहे. आम्हाला उत्तर प्रदेशात चांगलं यश मिळालं. मध्य प्रदेशमध्ये अजून काम करायचं आहे. बारामतीचा मतदार योग्य भूमिका घेईल, याची खात्री होती. भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाला जनतेनं धडा शिकवला, असं म्हणत शरद पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले, त्याबद्दल संघटनेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे. राज्यात एकप्रकारे परिवर्तनाची प्रकिया सुर झाली आहे. सुदैवाने देशपातळीवरील चित्र अतिशय आशादायक आहे. उत्तर प्रदेशमध्ये वेगळा निकाल येथील जनतेनं दिला आहे.
या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की, भाजपला या भागात जे यश मिळायचं, त्याचं मार्जिन फार मोठं असायचं. त्यांना आता मर्यादित अशा मार्जिनने जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ राष्ट्रीय पातळीवर आम्ही जे काम केलं, त्यामुळे देशात अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजाच्या विरोधात हा निकाल लागला आहे. मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, मार्क्सवादी आणि अन्य नेत्यांसोबत चर्चा केली.