चिपळूणमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. शरद पवार आजपासून दोन दिवस चिपळूण दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी तयारी करण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले असून यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या चिपळूण दौऱ्यानंतर आता शरद पवार देखील चिपळूणच्या दौऱ्यावर येत आहेत.
शरद पवार यांच्या सभेला महाविकास आघाडीतील नेते उपस्थित राहतील. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रथमच चिपळूणमध्ये येत असल्याची माहिती मिळत आहे.
या दौऱ्यात शरद पवार शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत असून शरद पवार सभेमधून काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.