राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.
शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होईल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत पक्षातील नेत्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे. त्यात अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.