राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज प्रदेश कार्यालयात बैठक सुरु झाली आहे. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या बैठकीत नेमका काय ठराव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. पवारांनी अध्यक्ष राहावे बैठकीत ठराव करण्यात आले आहे. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. पवारांचा राजीनामा हा निवड समितीने फेटाळला आहे मात्र आता जयंत पाटील यांनी जे ट्विट केलं आहे ते चर्चेचा विषय ठरत आहे. जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे की, आम्ही सर्व आम्ही सर्व साहेबांसोबत.. अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.