ताज्या बातम्या

Sharad Pawar; अजित पवारांना सोबत घेणार का? शरद पवारांची स्पष्ट भूमिका, म्हणाले...

शरद पवार यांनी अजित पवारांच्या भाजपसोबतच्या भूमिकेवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की विचारधारेच्या बाबतीत तडजोड न करता, मूळ विचारसरणी स्वीकारल्यास कुणाचीही अडवणूक होणार नाही.

Published by : shweta walge

अजित पवार यांनी ४० आमदारांसोबत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये बंडखोरी करत भाजपसोबत जाऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लोकसभेत मिळालेले यश आणि राजकारणातला अनेक वर्षांचा अनुभव अशा अनेक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. यातच अजित पवार हे भूमिका बदलतील आणि भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील अशा चर्चा सुरु आहेत. यावरच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'बोल भिडू'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत निवडणूक निकालानंतर अजित पवार हे भूमिका बदलतील आणि भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, ''हा काय माफी किंवा कोण दोषी असा प्रश्न नाही. प्रश्न फक्त एकच आहे की तुमची विचारधारा, आज ज्यांच्या मताची विचारधारा आम्हाला मंजूर नाही. आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही, असं म्हणता येणार नाही. कारण ५-५ वेळेला आमच्या विचारधारेचा आमचा कार्यक्रम घेऊन ते निवडून येऊन सत्तेत बसले. आता काही आमचं धोरण काही बदलवलं असं काही नाहीय आणि त्यामुळे जोपर्यंत ज्या विचारधारेचा आमचा सक्त विरोध आहे. त्यांच्याबरोबर जाऊन बसणे आणि त्यांच्यासोबत काम करणं हे भूमिका असेल, तर कुणालाचा प्रवेश नाही. अजित पवार असं नाही, कुणालाच नाही. जर आमच्यासारखी त्यांची विचारधारा असेल तर त्या ठिकाणी कुणाची अडवणूक केली जाणार नाही''. असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. भाजपासोबत सत्तेत बसणार नाही, अशी भूमिका घेऊन जर पुन्हा मूळ विचारसरणी स्वीकारली तर कुणाची अडवणूक करणार नाही, असे उघडपणे शरद पवार यांनी सांगितले आहे.

बारामती विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात उमेदवार का उतरवला ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कुटुंब म्हणून मी बघतच नाही. अजित पवार आणि आमचे सगळे सहकारी गेली 10-15 वर्षी कुठल्या पक्षाच्या नावावर निवडून आले कोणत्या पक्षाच नेतृत्व त्यांनी केलं किंवा पक्षांनी त्यांना आपल्या बरोबर घेतलं. आमचा संघर्ष कोणाच्या विरोधात होता. मागच्या निवडणुकीमध्ये आमचा संघर्ष होता भाजप विरोधात. त्यांची जी राजकीय विचारसरणी आहे ती आम्हाला पहिल्या पासून पसंत नाही म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात होतो. त्यांच्या विरोधी आम्ही लोकांना मत मांगितली.लोकांनी ती मत दिली. नंतर आमच्यातले लोक त्यांच्यात जाऊन बसले ही लोकांची फसवणुक आहे. आणि आज आमचा जो विरोध आहे. तो काही कौटुंबिक विरोध म्हणून नाही. त्यांनी उद्या हा पक्ष फोडला नसता पक्ष बदल केला नसता तर त्यानीच चालवलं असतं. मी काही त्या ठिकाणी चालवायला बसलो नव्हतो. नेतृत्व, अधिकार सगळ त्यांनाच दिलेल होत. आणि गेले 2-3 निवडणुका बघितल्या तर या सगळ्याचे अधिकार ह्याच लोकांना दिले होते. पण जोपर्यंत विचारधारेच्या बाबतीत तडजोड करत नाही तोपर्यंत विचारधारेच्या संबंधी तडजोड केली. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्यांच्या पंगतीत जाऊन बसले तर त्यांला विरोध आहे. इथे व्यक्तिगत विरोध नाही.

आणि मग हा विरोध करण गरजेच आहे. हे मी महाराष्ट्र्ला सांगतो. आणि माझा घरच्या मतदारसंघात करायच नाही. लोक काय म्हणतील हा संधीसाधूपणा आहे. स्वताच्या मतदारसंघात नातेनाईक होते म्हणून वेगळी भूमिका आणि आमच्यासाठी वेगळी भूमिका. एकदा सूत्र स्वीकारलं तत्व स्वीकारलं त्याच्यात तडजोड नाही असं ते म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी