Sharad Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

संघ प्रणित भाजप सरकारच्या काळात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पवारांच्या नावाची चर्चा?

येत्या 18 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी (Presidential Election on India) विरोधी पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. या बैठकांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचंही नाव पुढे येत असून, भारतातील सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ते विरोधी उमेदवार म्हणून आपलं स्थान निर्माण करतील अशी शक्यता आहे. काँग्रेसने (Congress) अध्यक्षपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा दिल्याचं देखील वृत्त आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गेल्या गुरुवारी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन शरद पवार यांची भेट घेतली. दोघांची मुंबईत भेट झाली होती. या भेटीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा झाल्याचं समजतंय.

राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने यावर अद्याप प्रक्रिया दिली नाही. रविवारी शरद पवार यांना अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांचाही फोन आला. खर्गे यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशीही चर्चा केली आहे. काँग्रेस खर्गे यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही फोनवर चर्चा केली असून, त्यांनी बुधवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विरोधकांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, भारताच्या पुढील राष्ट्रपतीसाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. तीनच दिवसांतच मतमोजणी केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपत आहे.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news