Amit Shah  Lokshahi
ताज्या बातम्या

Amit Shah: भाजपच्या अधिवेशनात अमित शहा कडाडले; म्हणाले,"शरद पवारांनी सर्वात मोठा भ्रष्टाचार..."

Published by : Naresh Shende

Amit Shah On Sharad Pawar: भाजपने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आहे. भ्रम पसरवून विरोधकांना निवडणूक जिंकायची आहे आणि ते भ्रष्टाचाराच्या गोष्टी बोलत आहेत. शरद पवारांमुळे भारताच्या राजकारणात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. या देशातील कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. शरद पवार भ्रष्टाचाराचे प्रमुख आहेत आणि हे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पण यावेळी शरद पवारांचं खोटं राजकारण चालणार नाही, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित झालं आहे. प्रत्येक घरात जाऊन या खोट्या गोष्टींना उत्तर द्यायचं आहे. हे खोट बोलतील आणि भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतील. खोट्याचा पर्दाफाश करायचा आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शहा पुण्यात भाजपच्या अधिवेशनात बोलत होते.

शहा आपल्या भाषणात पुढे म्हणाले, एक एक कार्यकर्ता कमळाला समर्पीत झाला पाहिजे. कमळाला जिंकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्यानं परिश्रमाची पराकाष्टा केली पाहिजे. एक एक कार्यकर्त्याने आपल्या साथीदाराला जिंकवून देण्यासाठी भाजपापेक्षाही अधिक मेहनत घेतली पाहिजे. महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड आपण जिंकलो, तर राहुल गांधींचा अहंकार संपून जाईल.

पवार साहेबांना मला विचारयाचं आहे की, दहा वर्ष महाराष्ट्रात त्यांचं सरकार होतं. केंद्रातही तुमचं सरकार होतं, मग तुम्ही दहा वर्षात महाराष्ट्राला काय दिलं? याचा हिशोब घेऊन या. खोटी आश्वासनं देण्याशिवाय तुम्ही काहिच दिलं नाही. यूपीएच्या दहा वर्षात केंद्राने महाराष्ट्राला फक्त १ लाथ ९१ हजार कोटी दिले होते. नरेंद्र मोदींनी दहा वर्षात १० लाख ५ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. पवार साहेब तुम्हाला हिशोबावर विश्वास नसेल, तर आमचे मुरलीधर मोहोळ तुम्हाला सर्व हिशोब देईल.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीनंतर आमचे कार्यकर्ते आमच्या विजयी अभियानात जोडले गेले आहेत. मी पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांचे आभार मानत आहे. निवडणुकीच्या अभियानात कार्यकर्ते भर उन्हात धावत होते आणि पक्षासाठी काम करत असल्याचं मी पाहिलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनतीची पराकाष्ठा करून भारतीय जनता पक्षाला यश देण्याचं काम केलं आहे, असंही शहा म्हणाले.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News