Devendra Fadnavis, Sarad Pawar, Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

शरद पवार आणि राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस देणार जोराचा झटका...!

मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल अशी घोषणा करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी खेळी खेळली की

Published by : shweta walge

अनिल ठाकरे, चंद्रपूर:- मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल अशी घोषणा करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी खेळी खेळली की राज्याचा राजकारणात मोठा भूकंप घडला. या भूकंपाचे धक्के वर्षभरानंतरही जाणवत आहेत. आता फडणविसांनी थेट राज्यातील दोन नेत्यांना मोठे धक्के देण्याची तयारी चालविली आहे. हे धक्के चंद्रपूरातून बसणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे शिलेदार भाजपवासी होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित राष्ट्रवादीचे डॉ.अशोक जीवतोडे आणि मनसेचे रमेश राजूरकर भाजपात प्रवेश करणार आहेत. या दोघांचा भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी, मनसेला मोठा झटका बसणार आहे.

राजकारणातील चाणक्य अशी ओळख देवेंद्र फडणवीस यांची. राज्यातील राजकारणाला फडणवीस यांनी मोठे हादरे दिलेत. एवढेच नाही तर फडणवीस यांनी राज्यातील राजकारणाला वेगळ्या वळणावर आणलं आहे. एकीकडे टीकांचा मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे फुलांचा वर्षाव फडणवीस यांच्यावर होत आहे. धक्क्यावर धक्के देणाऱ्या फडणवीस यांनी आता एकाच बाणाने राज्यातील दोन मोठ्या पक्ष प्रमुखांना घायाळ करण्याचा गेम प्लान आखला आहे. आज फडणवीस चंद्रपुरात आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय, ओबीसी नेते तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी डॉ. अशोक जीवतोडे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. जिल्हाचा राजकारणात आणि ओबीसी समाजात जीवतोडे यांचा प्रभाव आहे. जीवतोडे कट्टर विदर्भवादी असल्याने सर्व सामान्यात त्यांची विशेष ओळख आहे. जीवतोडे यांच्या प्रवेश्याने भाजपला बळ मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला मोठा झटका बसणार आहे. दुसरीकडे मनसेचे रमेश राजूरकर यांच्याही भाजपात प्रवेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये राजूरकर यांची ओडख प्रभावी व्यक्तिमत्व अशी आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजूरकर यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. त्यांना 33 हजारच्या आसपास मते मिळाली होती.

राजूरकर यांच्या सोबत वरोरा विधानसभा क्षेत्रातील अनेक सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. तशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये रमेश राजूरकर यांनी दिली. या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश्याने महाविकास आघाडीला मोठा झटका बसणार आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती