Shambhuraj Desai Lokshahi
ताज्या बातम्या

Shambhuraj Desai: शंभूराज देसाईंनी विरोधकांचा घेतला समाचार; म्हणाले, "येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत..."

भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यावर ते संविधान बदलतील, असा प्रचार विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत केला होता. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Naresh Shende

Shambhuraj Desai Speech : संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह पसरवून विरोधक महायुतीवर टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा गाजला होता. भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यावर ते संविधान बदलतील, असा प्रचार विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत केला होता. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "संविधान बदलण्यासाठी मोदींना ४०० पार जायचं आहे, असा प्रचार विरोधकांनी केला. मोदी साहेबांनी शपथ घेऊन सांगितलं, महाराष्ट्रात शिंदे साहेबांनीही सांगितलं की, ब्रम्हदेव आला तरीही संविधान बदलणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आपण बदलू शकत नाही, हे शपथपूर्वक सांगितलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला सावध होऊन पावलं टाकायची आहेत", असं आवाहन देसाई यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते विष्णूदास भावे सभागृहात बोलत होते.

शंभूराज देसाई विरोधकांवर टीका करत म्हणाले, आम्ही कर्ज नक्की काढू. पण गोरगरिब महिलांसाठी ते कर्ज फेडायची ताकद या महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये आहे. महिलांना आजपर्यंत १५०० रुपये तुम्ही का दिले नाहीत? महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर फुकट का दिले नाहीत? आपल्याकडचे शेतकरी मोटर बसवून शेतीला पाणी देतात. साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत ज्या शेतकऱ्याच्या मोटर आहेत, त्यांना मोफत लाईट देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. मी सुद्धा अर्थखात्याचा मंत्री होतो. या योजना पूर्ण करण्यासाठी कर्ज जरी काढलं, तरीसुद्धा आणखी कर्ज काढण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारची शिल्लक आहे.

मर्यादेच्या पुढं जाऊन कर्ज काढलंय, असं अजिबात नाही. लोकांसाठी आणि सामन्यांसाठी आम्ही जादा कर्ज जरुर काढलं आहे. ते म्हणतात, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काढलं, अडीच वर्षात कर्ज काढायला तुमचे हात कुणी धरले होते? तुमच्या हातात सत्ता होती ना? स्वत: करायचं नाही आणि दुसरा करतोय,त्याच्यावर टीका करायची. फक्त राजकीय उद्देशानं महायुतीच्या सरकारवर टीका होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news