ताज्या बातम्या

Shaina NC: शायना यांच्या नावातील 'एनसी'चा नेमका अर्थ काय?

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्या विरोधात खासदार अरविंद सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्यामुळे शायना एनसी हे नाव चर्चेत आले, अनेकांना शायना एनसी यांच्या एनसी या नावाचा अर्थ काय...

Published by : Team Lokshahi

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्या विरोधात खासदार अरविंद सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्यावर शायना एन सी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शायना एनसी हे नाव चर्चेत आले, अनेकांना शायना एनसी यांच्या एनसी या नावाचा अर्थ काय असा प्रश्न पडला असेलचं, जाणून घेऊयात शायना एनसी यांच्या नावातील एनसी याचा अर्थ काय...

शायना यांनी 2004 मध्ये राजकीयवर्तूळात प्रवेश केला. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा फडकवला. यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपद, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तसेच भाजपच्या कोषाध्यक्षपदाच्या शायना मानकरी झाल्या. सध्या त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला असून त्या 'धनुष्य बाण' चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

शायना यांचा जन्म मलबार हिल भागात झाला. त्यांचे वडिल सौराष्ट्र भागातील हिंदू गुजराती राजपूत असून त्यांच नाव नाना चुडासामा हे आहे. तर शायना यांच्या आई दाऊदी बोहरा मुस्लीम कुटुंबातील असून त्यांच नाव मुनिरा हे आहे. शायना यांच्या भावंडांची नाव अक्षय नाना चुडासामा आणि वृंदा हे आहे. शायना यांनी मारवाडी जैन मनीष मुनोत यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

शायना एनसी फॅशन डिझाईनर आहेत. वडिलांचे नाव नाना चुडासामा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नावापुढे लावलेले एनसी हे त्यांच्या वडिलांच्या नावाचे आणि आडनावाचे शॉर्टफॉर्म करुन तयार केलेला एक शब्द आहे. हा अर्थ आहे शायना एनसी यांच्या नावातील एनसी या नावाचा.

Diwali 2024: दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रींचा खास अंदाज, पाहा "हे" फोटो...

Rebellion of BJP aspirants in Risod Assembly to Shiv Sena?: रिसोड विधानसभेत भाजप इच्छुकाची बंडखोरी शिवसेनेला संपवण्यासाठी?

एकनाथ शिंदे अंधेरी पूर्वमधून प्रचाराचा नारळ फोडणार

Amruta Khanvilkar News Home: अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती, व्हिडिओ शेअर करतं दाखवली घराची पहिली झलक

Spinach Benefits For Women: महिलांसाठी पालक खाणं ठरेल फायद्याचे! कसे ते जाणून घ्या...