भाजपाने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला आहे. हे खरे आहे. पण आम्ही धाडस केले. आमच्या आमदारक्या पणाला लावून गुवाहाटीला गेलो. म्हणून भाजपा सत्तेत आले. आम्ही धाडस केले नसते तर भाजपच्या त्यागाचे काय महत्व होते. असा सवाल शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांना उपस्थित केला.
महायुतीतील जागावाटप बाबत अमित शहा यांनी भाजपच्या त्यागाची एकनाथ शिंदे यांना आठवण करून दिली होती. यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी सेना आमदारांच्या धाडसामुळे भाजपा सत्तेत आली. अशी उलट आठवण भाजपा नेत्यांनी करून दिली.
तसेच , राधाकृष्ण विखे पाटील , आणि उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर जरांगे पाटील यांना पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सकारात्मक चर्चा झाली असेल असा विश्वास आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली यावरून टीका केली. यालाच आता आमदार पाटील यांनी उत्तर दिले. न्याय हा उघड्या डोळ्यांनी करायचा असतो. न्याययदेवतेच्या हातात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देण्यात आले आहे. असे सांगत राऊत यंना शहाजी बापू यांनी उत्तर दिले.
काय म्हणाले होते अमित शाह?
"शिंदे जी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या." असं ते म्हणाले.