Shahaji Patil Team Lokshahi
ताज्या बातम्या

"शिंदे साहेबांनी केलेल्या क्रांतीमुळे अमेरिका, इंग्लंसह 33 देश हादरले"

उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरुन देखील यावेळी शहाजी पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.

Published by : Team Lokshahi

पुण्यातील सासवडमध्ये आज विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), विजय शिवतारे, शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी उपस्थित लावली होती. शिंदे साहेबांनी केलेली क्रांती ही सोपी नव्हती, यामुळे अमेरिका इंग्लंड हादरले असं म्हणत मी मरताना सुद्धा एकनाथ शिंदे यांची आठवण काढीन असं शहाजी पाटील म्हणाले. तसंच महाविकास आघाडीच्या लोकांवर टीका करताना शहाजी पाटील म्हणाले आम्ही सगळे ठाण्याकडे गेलो, सुरतमध्ये गेलो तरी यांना पत्ता लागत नाही. यांची सीआयडी आणि इतर खाती काय कामाची आहेत असं शहाजी पाटील म्हणाले.

शहाजी पाटील म्हणाले, की शरद पवारांना कॅन्सर आहे. जगातील सर्वात मोठा आजार कॅन्सर आहे. तरी ते सकाळी ५ वाजता उठून कामाला लागतात. मात्र यांच्या आजारपणाचं हे सांगतात. आजारपण घेऊन बसून चालत नाही. त्यांनी वेळेवर कुणाकडे तरी चार्ज द्यायला हवा होता. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला पाहिजे होता असं म्हणत शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

शहाजी पाटील यांनी भगसिंहांचं स्मरण करत सांगितलं की, "भगसिंहाच्या मृत्यूनंतर सगळे शोकमग्न झाले होते. तेव्हा भगतसिंहाची आई म्हणाली का शोकमग्न झाले आहात. तेव्हा सरपंचानं सांगितलं की, आई तुमच्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा आई भगसिंहाला भेटायला गेली अन् विचारला तु काय केलंस...तेव्हा भगसिंहानं सांगितलं की, आई तुझ्यापेक्षा मोठी आई आहे भारतमाता. त्या मातेला लुटणाऱ्या इंग्रजाला मी मारलं, तेव्हा भगसिंहाची आई म्हणाली माझ्या पोटातून असे १०० भगसिंग जन्माला यावेत." असं खुमासदार भाषण करत शहाजी पाटील यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. त्यानतंर त्यांनी त्यांचा खास डायलॉग सुद्धा याठिकाणी बोलून दाखवला.

या कार्यक्रमातून विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मागच्या काळात माझी प्रकृती ठिक नसताना मला अनेकवेळा डावलण्यात आल्याची भावना विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. तसंच पुरंदर (Purandar) भागातील पाण्याच्या समस्येवरुन त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बारामतीमध्ये बस स्टँडसाठी 200 कोटी दिले, मात्र आम्हाला 25 कोटी रुपये पाण्यासाठी दिले नाहीत. कित्येक वर्षांपासून आम्ही डोकी फोडून घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांशी संघर्ष करत इथे शिवसेनेचे लोक निवडून आणले, मात्र उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला असं विजय शिवतारे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने तीन वर्षात केलेला अन्याय एकनाथ शिंदेंनी तीस दिवसात संपवून टाकलं असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या रुपात पुरंदरकरांना देव भेटला असं विजय शिवतारे म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण