Share Market Team Lokshahi
ताज्या बातम्या

Share Market : शेअर बाजार 52 आठवड्यांच्या नीचांकावर, काय आहे कारण?

Published by : Team Lokshahi

मुंबई

सेन्सेक्स आणि निफ्टीने आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी घसरण नोंदवली. दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली बंद झाला. तो 1045.60 अंकांनी किंवा 1.99% घसरून 51,495.79 वर बंद झाला. निफ्टीनेही 52 आठवड्यांचा नवा नीचांक गाठला आहे. त्यात 331.55 अंकांची किंवा 2.11% घसरण झाली. 15,360.60 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण मेटल, आयटी आणि बँक समभागात झाली. तर सकाळी बाजार 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह खुला होता.

भारतीय शेअर बाजारासाठी गुरुवार काळा दिवस ठरला. जागतिक संकेतांमुळे, सकाळच्या वाढीनंतर भारतीय शेअरमध्ये नफावसूली दिसून आली. त्यानंतर बाजार लाल चिन्हावर बंद झाला.

शेअर बाजारात आज ऑटो, एनर्जी, ऑइल आणि गॅस सेक्टर, बँकिंग, आयटी, मेटल सेक्टर घसरणीसह बंद झाले. ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातही घसरण झाली आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 3 समभाग हिरव्या चिन्हात आणि 47 समभाग लाल चिन्हात बंद झाले. सेन्सेक्सचे सर्व 30 समभाग 1 हिरव्या चिन्हात आणि 29 समभाग लाल चिन्हात बंद झाले. वास्तविक युरोपियन देशांचे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह खुले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. सर्वात मोठी घसरण मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये झाली. मेटल इंडेक्स 4 टक्क्यांनी घसरताना दिसत आहे.

भारतीय बाजार का पडला

अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यूएस फेडरल बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि इतकी मोठी वाढ 28 वर्षांनंतर म्हणजेच 1994 नंतर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय बाजारावरही दबाव आहे. अमेरिकेत व्याजदर वाढवण्याचा हा निर्णय तेथील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे. अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली असून मे महिन्यात ती 8.6 टक्के होती.

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेश

महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद; कोणत्या घोषणा करण्यात येणार?

महाराष्ट्रात आज आचारसंहिता लागण्याची शक्यता

सलमाच्या जीवावर का उठला आहे लॉरेन्स बिश्नोई?

Manushi Chhillar: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा कमाल लूक; एकदा पाहाच