nagnath kotapalle  Team Lokshahi
ताज्या बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे निधन

पुण्यातील दीनानात मंगशेकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

Published by : Sagar Pradhan

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील दीनानात मंगशेकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक नागनाथ कोतापल्ले यांची कारकीर्द

नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.

मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (२००३) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत.

Latest Marathi News Updates live: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठकांचा सिलसिला

Sanjay Raut : काही अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट; संजय राऊत म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट

उद्धव ठाकरे यांचा नाना पटोले यांना फोन; कारण काय?