मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार होती. मात्र आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. दोनदा रद्द केली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मुंबई विद्यापीठाची निवडणूक घेण्याची हिंमत नाही.
तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करुन जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करुन तुम्ही जिंकू शकता अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरे जाणार. पण जिथं लोकांची मतं विकत घेता येत नाहीत, जिथे ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही. असे संजय राऊत म्हणाले.