फ्लॅट विकणे किंवा भाड्याने देण्यासाठी किंवा विकण्यासाठी आतापर्यंत त्या सोसायटीच्या NOC (Non Objection Certificate) ची गरज होती. त्यामुळे, NOC मिळविण्यासाठी आतापर्यंत अनेकांना अनेक फेरे मारावे लागत होते व त्यामुळे, घर विकणे किंवा भाड्याने देण्याची प्रक्रिया अतिशय वेळ घेणारी झाली होती. मात्र, आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र (Jitendra Awhad) आव्हाड ह्यांनी आता घर विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी आता NOCची गरज नाही अशी घोषणा केली आहे.
आव्हाडांचे ट्वीट:
"जर मालकाला त्याचा फ्लॅट भाड्याने द्यायचा असेल किंवा त्याचा फ्लॅट विकायचा असेल तर त्याला सोसायटीच्या एनओसीची गरज नाही... यामुळे द्वेष वाढत चालला आहे." असे ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.