विकास माने, बीड
बीडचा युवा क्रिकेटपटू सचिन संजय धस याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावले. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच सचिन हा क्रिकेटचे धडे गिरवतोय. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सचिन धस याचे वडील संजय धस बीड येथे आरोग्य विभागात कार्यरत आहेत. तर आई सुरेखा धस या पोलिस अधिकारी आहेत. सचिनला सुरवाती पासून क्रिकेटची आवड असल्याने त्याला बीडच्याच आदर्श क्रिकेट क्लबमध्ये सरावासाठी पाठवण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याचे प्रशिक्षक अजहर यांनी त्याला मार्गदर्शन केले. सर्वात प्रथम सचिन हा चौदा वर्षाखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळला, तेव्हापासून त्याच्या यशाचा आलेख चढताच होता.
प्रारंभी विभागीय स्तरावर खेळल्यानंतर त्याची चौथा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड झाली. त्या ठिकाणीही चमकदार कामगिरी केल्याने त्याची आता आशिया कपसाठी भारताच्या 19 वर्षाखालील संघात स्थान मिळाले आहे.