ताज्या बातम्या

Nana Patole : जागावाटपाचा तिढा जो आहे हा आज आम्ही संपुष्टात आणलेला आहे

Published by : Siddhi Naringrekar

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे नेते राहुलजी व सोनियाजींना या तानाशहा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिली हे सर्वांनाच माहिती आहे. तब्येत ठीक नसताना सोनियाजींना तासनतास ईडी कार्यालयात बसवून ठेवले. हे देशातील जनता विसरलेली नाही आहे. म्हणून या तानाशाही प्रवृत्तीच्याविरोधात जी लढाई काँग्रेसनं सुरु केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची जी इंडिया आघाडी आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे. जागावाटपाचा तिढा जो आहे हा आज आम्ही संपुष्टात आणलेला आहे. मोठं मन करुन आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपाचे सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टीकोनातून एक प्रयत्न आम्ही सुरु केलेला आहे.

तसेच नाना पटोले पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपाचे पाणीपत करणं आणि सत्तेच्या बाहेर काढणं. आज राज्यातलं जे सरकार आहे. भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी या जागेचा आपण उल्लेख करता आहे. आमचे सर्व कार्यकर्ते एकजूटीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. काल मोदी सांगतात ही नकली शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आहे त्याच शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचे आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करुन, सत्तेचा दुरुपयोग करुन शिवसेनेला जे तोडलं गेलं, राष्ट्रवादीला तोडलं गेले. हे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते विसरणार नाही आहेत.

महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून येतील. अशी परिस्थिती आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. मतविभाजनाचे राजकारण जे भाजप करते आहे त्याला ही यावेळेस पूर्णविराम लागणार आहे. हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार आहे.असे नाना पटोले म्हणाले.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर यंत्रणा सतर्क, शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय?

Shivsena UBT Candidate List | ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर, पाहा कुणाला मिळू शकते उमेदवारी

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन