प्रशांत जगताप, सातारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात असताना तब्बल 3 पोलीस लुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. यामध्ये औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक फौजदार बापूसाहेब जाधव आणि कॉन्स्टेबल किरण जाधव असे एकाच पोलीस ठाण्यातील तीन पोलीस ACB च्या जाळ्यात सापडले आहेत. एकाचवेळी तीन पोलिसांवर कारवाई झाल्याने सातारा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दराडे हे फरार झाले आहेत. अवैद्य दारू वाहतूक प्रकरणात मदत करण्यासाठी आणि पुढे कोणताही त्रास होणार नाही यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
या प्रकरणातील तक्रारदार हे 42 वर्षाचे असून त्यांचा परमिट रूम बार आहे. दारूचे अवैध वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित कारवाई प्रकरणात तक्रारदार हे सहायक पोलीस निरीक्षक दराडे आणि सहाय्यक फौजदार बापू जाधव याला भेटले. यावेळी दोन्ही संशयतांनी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच यापुढे त्यांना व्यवसायात कोणताही त्रास न देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. लाचेची मागणी केल्याने बारमालक तक्रारदार यांनी सातारा एसीबी मध्ये तक्रार दिली. लाचलुचपतच्या पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या पडताळणीमध्ये दराडे जाधव या दोघांनी पैशाची मागणी केल्याचे लक्षात आले रक्कम घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने ट्रॅप लावला लाचेची रक्कम सहायक फौजदार जाधव यांच्याकडे देण्याचे ठरले त्यानंतर औंध येथील जुन्या एसटी स्टँड परिसरातील पटांगणामध्ये जाधवने दुपारी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीने त्याला रंग या पकडले.. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.