प्रशांत जगताप | सातारा: साताऱ्यातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा. रिक्षात विसरलेल्या महिलेच्या बॅगेतील अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम परत केली. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालकाचा सत्कार केला.
साताऱ्यात सादिक शेख या रिक्षा चालकाने रिक्षामध्ये विसरलेल्या प्रवासी महिलेची बॅग प्रामाणिकपणा दाखवत महिलेला पोलिसांमार्फत परत केली आहे. महिलेला सोडल्यानंतर तिची बॅग रिक्षात राहून गेल्याचे सादिक शेख यांच्या लक्षात आले.बॅगेत महिलेचा मोबाईल,सोन्याचे दागिने,रोख रक्कम आणि एक मोठा सुरा आढळून आला.
बॅगमध्ये चक्क सुरा व इतकं सोनं आढळल्याने रिक्षा चालकास संशय आला. त्यामुळे त्यांनी थेट शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठत बॅग पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी बॅगेतील मोबाइलवरून महिलेला बोलावून घेत विसरलेली बॅग परत केली. बॅगेत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल परत माघारी केल्याने रिक्षा चालकाच्या प्रामाणिक पणाबद्दल पोलिसांनी सादिक शेख या रिक्षा चालकाचा सत्कार देखील केला.