ताज्या बातम्या

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर सप्तशृंगी ग्रामपंचायतीचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

Published by : Siddhi Naringrekar

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावात घडली. येथील पन्नासहून अधिक घरांवर दरड कोसळल्याने जवळपास 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आजही सकाळपासूनच बचावकार्य सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सप्तश्रृंगी गडावर माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. गडावर पायऱ्यांच्या बाजूला माती साचल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. यामुळे काही महिन्यापूर्वी सरकारकडून आधुनिक पद्धतीने संरक्षित जाळी बसवण्यात आली. या भागातील माती पावसाळ्यात खाली वाहून येते. परिसरात खालच्या बाजूला सुमारे चार हजार लोकसंख्येची नागरी वस्ती आहे. यासाठी हे पत्र लिहिण्यात आले आहे.

कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, "हर घर दुर्गा" हे अभियान देशासाठी प्रेरणादायी

Navratri 2024: नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शानासाठी जाताय? मग मुंबईतील "या" देवीला नक्की भेट द्या...

Dilip Walse Patil | Rohit Pawar : दिलीप वळसे पाटील पवारांना भेटण्याची शक्यता?Vidhan Sabha Election

Jarange Patil On Narhari Zirwa l नरहरी झिरवाळांचं बेमुदत आंदोलन; पहा काय म्हणाले जरांगे पाटील ?

Saptshrungi Mata: सप्तश्रृंगी मातेच्या चरणी तब्बल इतक्या महिलांना घडवले देवीचे दर्शन