Pandit Shiv Kumar Sharma Death प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि संतूर (music and santoor) तीय संगीताला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
पंडित शिवकुमार शर्मा यांचे चित्रपट जगतातही महत्त्वाचे योगदान होते. बॉलिवूडमध्ये 'शिव-हरी' (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) या जोडीने अनेक हिट गाण्यांना संगीत दिले. श्रीदेवीवर चित्रित झालेल्या 'मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ' या गाण्याचे संगीत या हिट जोडीने दिले होते.
15 मे ला होता कार्यक्रम
सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे शिवकुमार शर्मा यांचा १५ मे रोजी कार्यक्रम होणार होता. अनेक जण या खास क्षणाचा भाग होण्याची वाट पाहत होते. या कार्यक्रमात शिवकुमार शर्मा हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत गाणार होते. पण, या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी शिवकुमार शर्मा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
जम्मूत जन्म
शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे, यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यामुळे शिवकुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५मध्ये मुंबई येथे केले.