पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मोदींसाठी पुण्यात खास संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज हे नाव पुण्यातील विमानतळाला दिलं जाणार आहे. याविषयीचा निर्णय नुकताच झाला आहे त्यामुळे आता मोदींसाठी खास संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे.
दरवेळी मोदींच्या पुणे दौऱ्यातील पगडी चर्चेचा विषय ठरते. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी ही हटके पगडी तयार केली आहे. वारकरी संप्रदाय आणि अठरा पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न या पगडीमार्फत मोदींकडून करण्यात येणार आहे.
दरम्यान, येणाऱ्या काही काळामध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत आणि काही दिवसांमध्ये साची घोषणा होत असताना आता वारकरी संप्रदाय आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी खूश करण्यासाठी त्यांना साद घालण्यासाठी ही पगडी मोदी आता परिधान करणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. मोदींच्या स्पेशल पगडीची पहिली झलक लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता.