सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून पक्षबांधणी सुरु आहे. या यात्रेत त्या सातत्याने शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल करत असतात. त्या भाषणा दरम्यान सुषमा अंधारेंनी शिंदे गटातील आमदारांना ‘माझे भाऊ’ असे म्हटले.
याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. शिरसाट म्हणाले की, आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. मात्र तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.