जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत. यावरुनच उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसन यांच्या बाजूने असलेल्या लोकांना त्या मदत करतात बाकी सगळ्यांना तडीपार आणि त्रास देण्याचे काम करतात असल्याचा आरोप त्यांनी लगावला आहे.
ते म्हणाले की, राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना ठेवू नये अशी मागणी होतेय. माञ निवडणुक आयोग म्हणते ते आमच्या हातात नाही. एकीकडे दुसऱ्या राज्यात पोलिस संचालक बदलतात.आमच्या लोकांना तडीपार करने, त्रास देणे सुरु आहे. रश्मी शुक्ला यांना का आठवत नाही. त्यांचा मागील इतिहास चांगला नाही. त्यांच्यावर आरोप होते तरी फडणवीस यांनी पदावर घेतल.
अमचे फोन अजुनही टॅपिंग सुरु आहे. आमच्या मतदारसंघात आमच्या प्रतिनिधींना त्रास दिला जातो. शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचा अभय आहे. रश्मी शुक्ला यांचे नेमणूकच बेकायदेशीर असल्याच ते म्हणाले.
दरम्यान, दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन करून मनसेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला मुंबई पालिकेतून देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीबाबत ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाला माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरेदेखील उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणीही ठाकरे गटाने केली. यावरुनच राऊत म्हणाले की, आता निवडणुका आहेत आणि त्यामध्ये हा सोहळा होत आहे. यापूर्वी सोहळ्याला कधी विरोध केला का? मात्र आता अशा काळातून प्रचार होतोय. दीपोत्सव किती दिवस होतो आणि दसरा मेळावा एकच दिवस होतो. आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्यावर आक्षेप घेणं चुकीचं नाही अस ते म्हणाले.
महायुतीचा विधानसभा निवडणुकीत होईल पराभव ठरलेला आहे. जनतेने ठरवलंय की यांना हरवायचं अस देखील ते म्हणाले.