ताज्या बातम्या

Sanjay Raut : कोणतंही सरकार, कोणतीही संस्था ही बिनचेहऱ्याची असू नये

आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर आता प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल. त्याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता. राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवले असते तर किमान 25 - 30 जागा सहज वाढल्या असत्या.

कोणतेही सरकार, कोणतीही संस्था ही बिन चेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे. हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना मतदान केलं, लोकांनी मोदींना मतदान केलं, लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं. ठिक आहे पक्ष असतो, संघटना असतात, आघाडी असते. आम्ही एकत्र बसू या विषयावर चर्चा करु.

यासोबतच ते म्हणाले की, महाविकास आघाडी आहे. तीन पक्ष एकत्र आहेत. इतर लहान घटकपक्ष एकत्र आहेत. चेहरा कोण याविषयी आमच्यामध्ये मतभेद नाही आहेत. शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला हे आपण पाहिलं. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात तिघं एकत्र लढणार आहोत. साधारण 175 - 180 जागा आम्ही विधानसभेच्या जिंकू. यावेळी तुम्हाला खात्रीने सांगू. असे संजय राऊत म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश