विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसची सात मत फुटली. हे काय लपून राहिलेलं नाही. स्व:ता काँग्रेसचं अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मत फुटली यातसुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ते आधीच फुटलेलं आहेत. मागच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलेला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. हे मानण्याची गरज नाही.
यासोबतच ते म्हणाले की, शिवसेनेचं एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची 12च्या 12 मत जयंत पाटील यांना पडलेली आहेत. काँग्रेसची जी 7 मत होतीत ती गेल्या 2 वर्षापासून काँग्रेसबरोबर नाहीत. हे कागदावर आहे आणि ती नावांसमोर सरळ आलेली आहे. याच 7 लोकांनी मागच्यावेळेस चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला. त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्र जिंकला असे होत नाही. महाविकास आघाडी ही मजबूत आहे. महाविकास आघाडीने त्यांचे दोन्हीही उमेदवार निवडून आणलेलं आहेत. जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलं. जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांची सर्व मतं पडली आणि दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली थोड्या गणितामध्ये अशा प्रकारच्या चुका होतात. असे संजय राऊत म्हणाले.