ताज्या बातम्या

राज-उद्धव एकत्र येणार का? संजय राऊत थेट म्हणाले...

Published by : shweta walge

निवडणुका कधी होतील, हे सांगणे कठीण कारण कायद्याचे राज्य असते तर सांगणे सोपे होते. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. संजय राऊतांनी आज लोकशाही पॉडकास्टमध्ये रोखठोक मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते. जागा वाटपासंदर्भात मविआमध्ये समन्वय आहे. या आघाडीत जिंकेल त्याची जागा हे सूत्र आम्ही ठरवले आहे. असं म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असणार आहे. आंबेडकर हे देशपातळीवरील नेते आहेत, त्यांना खूप मोठा वारसा आहे. आंबेडकरांचे चांगले संघटन आहे. हे सर्व असतील तर ४८ पैकी ४० जागा आम्ही जिंकू.

महायुतीचा दावा असेल तर त्यांना ४८ पैकी ५० जागा जिंकू द्या. एकनाथ शिंदेंना कोण मतं देणार आहेत. ग्रामीण पंचायत निवडणूकात कीती जागा मिळाले. अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान त्यांना ​राज-उद्धव एकत्र येणार का? असा प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, ​राज ठाकरे हे ठाकरेअसले तरी शिवसेनेवर त्यांनी कधी दावा केला नाही. ​चर्चा होणार तर होऊ द्या, चर्चा होणे चांगले आहे.  माझे चांगले संबंध आहे राज ठाकरेंशी, अस ते म्हणाले आहेत.

Badlapur Sexual Assault: बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर

Pune International Airport: पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे' नाव; राज्य सरकारचा निर्णय

Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...