मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर राजकीय वातावरणाला वेगळे वळण मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं.
यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, "शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीच घरातले गुपित फोडले. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला (Maharashtra) ओळखच झाली नसती" असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
यासोबच राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात सरळ सरळ महाभारत घडले. एकाच घरातील लोक एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत हे खरे, पण येथे कोणी भीष्म, कृपाचार्य व द्रोणाचार्य दिसत नाहीत. हरुन-अल-रशीद यांचे पात्र महाभारतात नव्याने उदयास आले इतकेच" आणि "काळ्या पैशांचा महापूर कसा आला ते महाराष्ट्रातील सत्तांतरात दिसून आले. नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी" असा हल्लाबोल संजय राऊत यांनी फडणवीसांवर केला आहे.
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के!' येथे थोडा स्वल्पविराम मारून आमदार गोरंट्याल पुढे म्हणतात, 'पचास खोके… पक्के!' एकदम ओक्के!'या सगळ्यांची उघड चर्चा आता लोकांत सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आमचीच, असे सांगणाऱ्यांचे आत्मे या खोक्यांत बंदिस्त आहेत, असे गोरंट्याल सांगतात ते खोटे नाही. असे सामनाच्या रोखठोकमधून म्हणण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. ''या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.'' काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा. असं देखिल सामन्याच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलं आहे.