Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

Karnataka Election : कर्नाटकच्या जनतेनं मोदी, शाह यांना नाकारल : संजय राऊत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत.

Published by : shweta walge

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, भाजपा आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं आकडेवारीवरून कळत आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजवर चांगलीचं टीका केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे, असा संजय राऊत म्हणाले. राज्या राज्यातून भाजपच्या टोळ्या कर्नाटकात खोके घेऊन आल्या होत्या. पण कर्नाटकातील जनता भाजपच्या दबावाला बळी पडली नाही. आता पराभव झाला तरी तोडफोड करून काही करता येते का ते भाजप पाहत आहे, असा आरोप त्यांनी केला.

कर्नाटकात कोणतीच स्टोरी चालली नाही. फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली. कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली सत्याच्या बाजूने आले. हा मोदी आणि शाह यांचा पराभव झाला. मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पराभव समोर आल्याने त्यांनी बजरंबलीला निवडणुकीत आणले. पण बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली, असा हल्लाच त्यांनी चढवला.

आपल्याच लोकांशी गद्दारी

महाराष्ट्रातून काही लोक कर्नाटकात प्रचाराला गेले होते. राज्यातून मोठी टोळी गेली होती. पण त्यांनी जिथे प्रचार केला तिथे भाजपचा पराभव झाला. भाजपचा प्रत्येक ठिकाणी दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी आम्ही प्रयत्न केले. आमची कमिटमेंट आहे. त्यामुळे आम्ही प्रचाराला जातो. हार-जीत आम्ही पाहत नाही. या जागा पडाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पैशाचा महापूर ओतला होता. आपल्याच लोकांची गद्दारी करण्यासाठी त्यांनी हे केलं, असा आरोपगही त्यांनी केला.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha