Sanjay Raut On Eknath Shinde : आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो, पण त्यांची आपआपसात चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, शरद पवार, राहुल गांधी या दोघांचं एकमत होतं की, या सरकारचं नेतृत्व अशा चेहऱ्याने करावं की, महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत, हे सांगणारे सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही वरिष्ठ आहोत, आम्ही ज्यूनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, २०२९ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु झाला होता, त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली होती. तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती. शिवसेनेकडून शिंदे यांचच नाव पुढे केलं होतं. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की, मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीचा निर्णय काय येईल, ते माहित नाही.
पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत. फडणवीसांपासून भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी तशी भूमिका घेतली होती. शिंदे यांचा कामाचा अनुभव कमी होता. शिंदे कोणालाच नको होते. शिंदे यांच्या कामाची पद्घत पैसा फेको आणि तमाशा देखो,अशी होती. त्यांनी सरकारचं नेतृत्व करु नये. त्यांना कोणताही अनुभव नाही. फक्त पैशाचा व्यवहार किंवा वापर करणं, म्हणजे नेतृत्व नाही. आम्ही शिंदेंना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले होते.