वांद्रे रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली. वांद्रे रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एक येथे गर्दीत प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील दोन जण गंभीर जखमी आहे. यावरुनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसच देवेंद्र फडणवीस राजकीय शत्रू आहेत पण मी त्यांच्याकडे व्यक्तिगत दुश्मन म्हणून पाहतो अस देखील म्हणाले.
ते म्हणाले की, मोदींचे सरकार आल्यापासून जवळ जवळ देशात 28 मोठे अपघात झाले आहेत. तुम्ही बुलेट ट्रेन वर चर्चा करत आहात, हाय स्पीड ट्रेन वर चर्चा करत आहात पण मुंबई उपनगरीय रेल्वेच्या बाबतीत ज्या सुधारणा करायला पाहिजे त्या संदर्भात कोणीही चर्चा करायला तयार नाही.
रेल्वेच्या समस्या वर्षांनुवर्षे तसेच आहेत. आज रविवारच्या दिवशी देखील एवढी प्रचंड गर्दी होऊन एवढी चेंगराचेंगरी झाली. काही लोक जखमी झाले. रेल्वेमंत्री महाशय आहेत ते बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नाही आहेत. आणि आमचे लोक जे प्रवासी आहेत ते चेंगरून मरत आहेत.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले की, व्यक्तिगत दुश्मनी राजकारणात असू नये पण भारतीय जनता पक्षाने व्यक्तिगत दुश्मनी तयार केली आहे . राजकारणात विचारांची लढाई विचाराने व्हावी व्यक्तिगत दुश्मनी घेऊन राजकारण करू नये हे एक संस्कार आहेत महाराष्ट्रामध्ये. भारतीय जनता पक्षाच्या हातात विशेषतः फडणवीस यांच्या हातात आणि दिल्लीमध्ये मोदी शहा यांच्या हातात सूत्र गेल्याने राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेला आहे. फडणवीस जरूर आमचे राजकीय शत्रू आहेत पण मी त्यांच्याकडे व्यक्तिगत दुश्मन म्हणून पाहतो.