हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज (रविवार १७ नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलले होते, की मी दिल्लीची लाचारी करणार नाही आणि दिल्लीचे बूट चाटणार नाही. कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवीन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक दिल्लीचे बूट चाटतात. दिल्लीचे मुजरेगिरी करत आहेत. हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला आहे, असं संजट राऊत म्हणालेत.
काय म्हणाले संजय राऊत?
आज हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन 17 नोव्हेंबर आणि महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत हे निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने नावाने लढत आहोत. कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली महाराष्ट्राचा आरक्षण मुंबईचा रक्षण मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हे सगळं गेलं अडीच वर्षात संकटात आहे.
महाराष्ट्रावर गुजरातने ज्याप्रकारे आक्रमक केलं आणि आमचे राज्यकर्ते सध्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातील काही लोक गुजरातची लाचारी करत आहेत गुजरातच्या नवनिर्माण लागले. दिल्ली प्राचार्य करत आहेत. हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हता किंवा नाही बाळासाहेबांनी आम्हाला ताट पाठीचा काना दिला. बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवला.
एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण स्वतःला विकू नको या सगळ्याचे आज आम्हाला आठवण येते आणि या वेळचे निवडणूक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या भूमिका त्यांचा विचार त्यांचे महाराष्ट्रावर मराठी माणसावर असलेले रून हे केंद्रस्थानी ठेवून लढले जात आहे.
आम्ही सगळे काल प्रियंका गांधी शिवसेनाप्रमुख यांचा संदर्भ दिला शरद पवार आणि आम्ही सगळे बाळासाहेबांच्या विचारांची मशाल घेऊन पुढे निघाले आहोत. आजचा दिवस हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करण्याचा दिवस आम्ही रोजच स्मरण करतो आज विशेष महत्त्व आहे.
नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचा अस्तित्व गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे संपवले आहे आणि महाराष्ट्र राज्याची ही निवडणूक आहे आणि या राज्यात सर्व सुरळीत चालले असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांच्या बगलबच्चांना त्यांचा पराभव दिसत आहे म्हणून जात धर्म हिंदू मुसलमान बोट जिहाद वगैरे वगैरे विषय त्यांनी आणले.
देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातला बेरोजगारी वरती युद्ध पुकारले पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याच्यावर युद्ध पुकारले पाहिजे महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला त्यांचेच नेते पळून येतात आणि आमच्या तरुणांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे त्याच्यावरती युद्ध पुकारले पाहिजे पण महागाईच्या विरुद्ध पुकारले पाहिजे.
लसूण पाचशे रुपये किलो कांदा 100 रुपये किलो झाला आहे. असे अनेक विषय आहेत त्याच्यावर न बोलता निवडणुका जिंकण्यासाठी हा जीहाद तो जिहाद खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या नालायकपणा विरुद्ध महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने युद्ध पोखरला आहे त्याला तुम्ही जिहाद म्हणत असाल पण ते युद्ध पुकारले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटे आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात ती आम्ही या वेळेला उपटून टाकू भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लावली आहे ती या राज्याची जनता सहन करणार नाही.