संजय देसाई, सांगली
सांगली जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले आहे. तर तासगाव तालुक्यातील वायफळे सह परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. तर तासगाव तालुक्यात ७८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुराचे पाणी सावळज बिरणवाडीला जोडणाऱ्या अग्रणी नदीवरील पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला.
पावसामुळे काढणीला आलेला खरीपावर संकट आले आहे. दमदार पावसाने द्राक्ष बागांवर डाऊनी व घडकुज होण्याची भिती आहे. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदील झाला आहे.