समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघाताची मालिका सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्त थांबवावी अशी याचिका नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्ग राज्याच्या विदर्भ भागाला राजधानी मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतुकीला परवानगी देण्यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात यावी अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली.
नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभावमूळे समृद्धी महामार्गावर सुरू झाल्याच्या आठ महिन्यापासून झालेल्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्राण गमावे लागले आहे .