राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्याची महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीला पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्तीची स्थापना करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्ती सत्तेत आल्यास त्याचे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय व्हिजन असेल यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज लोकशाही वाहिनीच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी त्यांनी बच्चू कडू, राजू शेट्टी तिसऱ्या आघाडीत का आले? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमच्या तिघांमध्ये एक सामान्य मुद्दा आहे. आम्ही तिघही चळवळीचे नेते आहोत. चळवळीचे नेते असल्यामुळे नितीमता दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहेत. बच्चू कडू सत्तेत असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांच काही पटल नाही तरी आपली बाजू मांडायचे. तसच राजू शेट्टीने सुद्धा केलय. माझी सुद्धा भूमिका तिच आहे. मी बऱ्यापैकी स्पष्ट बोलतो. चांगली चळवळ उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.