Sambhajiraje Chhatrapati  Team Lokshahi
ताज्या बातम्या

अफजलखानाच्या कबरीवर संभाजीराजेंचं ट्वीट; अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयाचं केलं स्वागत

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली आहे.

Published by : Vikrant Shinde

शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली आहे. काल रात्रीपासूनच अतिक्रमण पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. या अतिक्रमण पाडण्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संभाजीराजे?

अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत.

आता संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये नमुद केल्या प्रमाणे विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामं व अतिक्रमणं हटवण्यासाठी सरकार हालचाली करणार का? हे पाहणं गरजेचं आहे.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड