Sambhajiraje Chhatrapati Lokshahi
ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपतींची सरकारवर सडकून टीका; म्हणाले, "विशालगडावर अतिक्रमण..."

विशाल गडावर झालेल्या हिंसक प्रकरणामुळं माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Naresh Shende

Sambhajiraje Chhatrapati Press Conference: विशाल गडावर झालेल्या हिंसक प्रकरणामुळं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी याबाबत कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवभक्तांवर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

दीड वर्षापूर्वी आम्ही सर्व संघटना आणि शिवभक्त विशालगडला एकत्र गेलो होतो. विशालगडची परिस्थिती पाहिली, तर तिकडे आजही भयानक अवस्था आहे. त्यांच्या पद्धतीने ते मद्यपान करतात. कपलखाना खुलेआम सुरु ठेवायचा. बकरे, कोंबड्या कापून पार्ट्या करतात. सरकारनेही अतिक्रमण केलं आहे. माझा प्रशासनाला प्रश्न आहे की, किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येतो. एक दगड सुद्धा हलवायचा असेल, तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते.

प्रशासनाने तिथे पूल बांधला आहे. ग्रामपंचायत बांधली आहे. तिथे राहण्यासाठी अनेक लोकांना परवानग्या दिल्या आहेत. हे अतिक्रमण कोण काढणार? ही कुणाची जबाबदारी आहे. अतिक्रमण काढणं गरजेचं आहे, यासाठी दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे. लोकप्रतिनिधींनी खो घातल्यानंतर कोर्टात हा विषय गेला. आजपासून सर्व अतिक्रमण काढलं जाईल, असा निर्णय तुम्ही काल घेतला. शिवभक्तांच्या आक्राशामुळे तुम्ही निर्णय घेतला. अतिक्रमण काढण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, मग दीड वर्षात तुम्ही अतिक्रमण का काढलं नाही. हा माझा प्रश्न आहे. इथला स्थानिक नेता मला पुरोगामित्व शिकवतो. हा विषय न्याप्रविष्ट आहे, मग आज परवानगी कशी मिळाली? शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकवू नये, त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला आहे.

भिमा-कोरेगावला ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी आणि शरद पवार साहेब संसदेत याविषयी बोललो आहे. संभाजीराजे छत्रपतींनी दिल्लीत पहिल्यांदा संसद भवनात शाहु महाराजांची जयंती सुरु केली. संसद भवनात एकदाही शाहू महाराजांची जयंती पार्लमेंटमध्ये झाली नव्हती, मी त्याची सुरुवात केली आहे. यासिन भटकळ अतिरेकी होता, इंडियन मुझाहिद्दीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला, त्याचा मुख्य आरोपी आहे. हा यासिन भटकळ विशाल गडला राहिला होता. ही त्याची नोंद आहे. विशाल गडावर किल्ल्यावर एव्हढा मोठा अतिरेकी राहिला आहे.

त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं का? आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय आहे. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आहे. गड-किल्ल्यांसाठी मी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. मी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून विशाल गडासाठी ५ कोटी रुपये दिले आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न नसावा का? दीड वर्षापासून मी मागं लागलो आहे. सरकारने आणि प्रशासनाने याबाबत का गांभीर्य घेतलं नाही? असा सवालही उपस्थित संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय