Sambhajiraje Chhatrapati  Team Lokshahi
ताज्या बातम्या

पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा आपले लोक निवडून आणू - संभाजीराजे छत्रपती यांचे जरांगेंना आवाहन

येत्या १७ तारखेला महाशक्ती आघाडीची बैठक होणार आहे. आगामी निवडणुकीत जागांबाबत चर्चा होणार आहे. पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा आपले लोक निवडून आणू असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांना केले आहे.

Published by : Team Lokshahi

"मनोज जरांगे पाटील आणि आमचा उद्देश एकच आहे. आगामी निवडणुकीत पाडण्याचे राजकारण करण्यापेक्षा आपण आपले लोक निवडून कसे आणू हे पाहू जेणेकरून आपण मराठा समाजाचे आणि इतर समाजाचे विषय चांगल्या पद्धतीने विधानसभेच्या पटलावर मांडू शकू," असे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले असल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. लातूर मार्गे नांदेड दौऱ्यावर जात असताना ते लातूर इथ पत्रकारांशी बोलत होते.

राज्याच्या राजकारणातील गोंधळ पाहून सामान्य माणूस सध्या अस्वस्थ झाला आहे. एक नवीन पर्याय म्हणून लोक स्वराज्य पक्षाकडे पाहत आहेत स्वराज्य पक्ष सहभागी असलेली परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे ते म्हणाले. येत्या १७ तारखेला महाशक्ती आघाडीची बैठक होणार असून, त्यात आगामी निवडणुकीत लढवायच्या जागांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी लातुरात दिली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी