जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
तसेच चे म्हणाले की, मी कधीही राजकारण केलं नाही मी समाजकारण केलं आहे. गरीब मराठा समाजाला कधी न्या मिळवून देणार हे पहिलं सांगा. ज्या माणसानं अंतरवाली सराटी गावात हे कृत्य करण्याचे आदेश दिलेत, त्याचं निलंबन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला. असे संभाजीराजे म्हणाले.