ताज्या बातम्या

मराठ्यांना उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसलाय? संभाजी भिडे

Published by : shweta walge

शिवप्रतिष्ठानकडून 25 ऑगस्टला सांगली बंदची हाक देण्यात आलीय. बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हा बंद पुकारण्यात आलाय. 20 ऑगस्टला रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात येणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रियाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी दिलीय. तसंच मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले की, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.

बांगलादेशवरील प्रकारावर ते म्हणाले की, पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदूस्थानकडे आश्रयाला आल्या, दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. पंतप्रधान भारतात आल्यावर बांगलादेश मध्ये प्रतिक्रिया उमटल्या . हिंदूंवर अत्याचार होतोय, बांगलादेशमध्ये सुरू असलेला अत्याचार तात्काळ थांबला पाहिजे. हिंदूस्थानमध्ये याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही. बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतरन नको ,त्याना बांगलादेश मधेच सुरक्षा मिळायली हवी. सगळ्या हिंदू राजकारण लोकांनी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवे, असे संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, बांगला देशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक झाली आहे. बांगलादेशातील अत्याचार थांबवा अशी हाक संभाजी भिडे यांनी सरकारला मारली आहे. बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने अशी पावले उचलली पाहिजेत की तिकडे सुरू असणार नंगानाच थांबला पाहिजे. याचाच निषेध करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदची हाक भिडेनीं दिली असून 20 तारखेला रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण सांगली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने