ताज्या बातम्या

मोदी रोज पुंगी वाजवतात, त्यावर अंधभक्त डोलतात; सामनातून हल्लाबोल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींचा तुलना त्यांनी सापासोबत केली आहे. यावरुन भाजपाने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे.

यातच आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून खरगेंच्या वक्तव्याचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले आहे की, भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे.भगवान शंकराच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

तसेच त्यांनी पुढे लिहिले आहे की, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतीचा राखणदार आहे. नागराज आणि सापराज हे हिंदू धर्मात श्रद्धेच्या स्थानी आहेत. त्यांची पूजा केली जाते. त्याच्यात विष असूनही पूजा केली जाते. त्यामुळे सापाची पदवी एखाद्याला दिल्यास त्याने उसळायची गरज काय?भाजपच्या जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपने त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात आम्हीही 30 वर्ष सापाला दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावर फुत्कारत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने विषाचा महायज्ञ मांडला आहे. भाजपचे लोक देशद्रोही फुत्कार सोडत आहेत. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जाते. असा जोरदार हल्लाबोल सामनातून मोदींवर करण्यात आला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news