अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिश्नोईकडून धमकी देण्यात आली आहे. धमकीची माहिती मिळताच सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सलमानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा ई-मेल आल्यानंतर सलमान खानच्या टीमने या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे.
कलम 120 बी, 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सलमानला आलेल्या मेलमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई, रोहित गर्ग, गँगस्टर गोल्डी ब्रार, मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.