sales drop during festivals 
ताज्या बातम्या

यंदा सणोत्सवातील खप निम्म्यावर

चालू वर्षात सणासुदीला बाजार गर्दीने फुललेले दिसले असले तरी प्रत्यक्षात खपातील वाढीचा दर निम्म्यावर घसरून 15 टक्क्यांवरच सीमित राहिल्याचे जपानची दलाली पेढी नोमुराने प्रसिद्ध केले आहे.

Published by : Team Lokshahi

सणावाराला ग्राहकांचा खरेदीवर भर असतो. सणासंबंधी सजावटीच्या वस्तू, खाद्यपर्दाथ, नवीन कपडे, भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू खरेदीवर ग्राहकांचा कल असतो. नुकतीच दिवाळी संपली आहे. वर्षातून येणाऱ्या दिवाळीसाठी ग्राहकांडकडून भरभरून खरेदी केली जाते. मात्र, यंदा दिवाळी, सणवाराला खप निम्म्यावर आला असल्याची माहिती मिळत आहे.

चालू वर्षात सणासुदीला बाजार गर्दीने फुललेले दिसले असले तरी प्रत्यक्षात खपातील वाढीचा दर निम्म्यावर घसरून 15 टक्क्यांवरच सीमित राहिल्याचे जपानची दलाली पेढी नोमुराने प्रसिद्ध केले आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळात किरकोळ विक्री (ऑफलाइन आणि ऑनलाइन) वाढली आहे. परंतु एकूण वाढीचा दर तुलनेने घटला आहे, असे नोमुराच्या टिपणाने म्हटले आहे. वस्तू व उत्पादनांच्या खपातील वाढ 2023 मधील दिवाळीच्या दिवसांमध्ये 32 टक्के आणि 2022 मध्ये 88 टक्के होती. शहरी ग्राहकांनी खरेदीत आखडता घेतलेला हात याला कारण ठरल्याचे विश्लेषकांनी नमूद केले आहे.

ग्रामीण भागात आणि दुय्यम व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये सणासुदीची मागणी स्थिर राहिली, तर महानगरांमध्ये आणि औद्याोगिक क्षेत्रातून मागणी कमकुवत राहिल्याने एकूण ग्राहक मागणीत नीरसता दिसून आली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्रालयाने शहरी मागणी कमजोर असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. नोमुराच्या विश्लेषकांच्या मते, डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सणासुदीच्या विक्रीतील कसर भरून काढली जाईल.किरकोळ विक्रीतील वाढ 36.4 टक्क्यांवरून 13.3 टक्क्यांपर्यंत रोडावली. ई-कॉमर्स विक्री वाढली आहे, तर सोन्याची विक्री ही मूल्यानुरूप, मात्र वजनानुरूप विक्रीचे प्रमाण 2024 मध्ये घटलेले दिसेल, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अंदाजाचा हवाला नोमुरानेही तिच्या टिपणांत दिला आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

23 तारखेला आयटम बॉम्ब फुटणार-एकनाथ शिंदे

Latest Marathi News Updates live : पंतप्रधान मोदींच्या नाशिकच्या सभेच्या वेळेत बदल

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Donald Trump Wins: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान