ऑगस्ट १४, २०२२ – स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवाची लाट देशभर पसरत असताना, ईशा फौंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी राष्ट्रगीत गाऊन पाठवलेल्या एका संदेशात म्हटले आहे: “अब्जावधी हृदयांमध्ये वास करणारी ही माता आहे. माझी प्रिय भारतमाता, तू आमच्या हृदयाचे ठोके, आमच्या ओठांवरचं गाणं आणि जगाला वाट दाखवणारा प्रकाश असू दे.” (Sadhguru's promotion of 'Har Ghar Tiranga')
व्हिडियो इथे पाहा - सद्गुरूंनी गायलेले राष्ट्रगीत -
https://twitter.com/sadhgurujv/status/1558474990613577728
राष्ट्रीय झेंड्याशी भावनिक नातं जोडणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये लोकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत सद्गुरू म्हणाले, “तिरंगा, जो आपल्या प्रिय भारताचे प्रतिक आहे, आपल्याला प्रदेश, धर्म, जात आणि वंश, याच्यापलीकडे जाऊन एकत्र आणतो. हे प्रतिक आपल्या मनात आणि हृदयात असंच फडकत राहून आपलं भव्य भारताचं स्वप्न खरं करण्याच्या दिशेनं पुढे जायला मदत करू दे.
भारताच्या विकासाच्या प्रक्रियेपासून जे वंचित राहिलेले आहेत, त्यांच्या कल्याणाची आणि समृद्धीची खात्री करण्यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना आणखी प्रबळ करण्याची गरज आहे यावर सद्गुरूंनी भर दिला.
सद्गुरूंचा स्वातंत्र्य दिनाचा संदेश पाहा: