Sadabhau Khot Lokshahi
ताज्या बातम्या

Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर सडकून टीका; म्हणाले, "पाठीत खंजीर..."

Published by : Naresh Shende

Sadabhau Khot On Sharad Pawar: विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार गटाडून पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता. महायुतीने या निवडणुकीत ९ पैकी ९ जागा जिंकून विजयाचा झेंडा रोवला. त्यानंतर मताचं गणित नेमकं कुठं चुकलं? याबाबत महाविकास आघाडीत खलबतं सुरु झाली आहेत. मात्र, विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. "जयंत पाटील यांचा पराभव म्हणजे या महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा पराभव आहे. हे शरद पवार यांनी घडवून आणलं आहे. शेतमजूरांचा अपमान शरद पवार यांनी केला आहे, म्हणून चळवळी करणाऱ्यांच्या पाठीत शरद पवार यांनी खंजीर खूपसला आहे", अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना खोत म्हणाले, जयंत पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. शेतकरी चळवळीतील खंबीर नेतृत्व आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी, शेतमजुरांची आणि श्रमिकांची लढाई लोकांपर्यंत पोहोचवली. पवार साहेब जाणते राजे आहेत. त्यांना समजायला पाहिजे होतं की आपण उद्धव साहेबांचं सरकार आणू शकतो, त्यांना मुख्यमंत्री करू शकतो. एका शेतकरी नेत्याला उभं करताना, ते निवडून येतील का? यबाबत त्यांनी पहिल्यांदा खातरजमा करायला हवी होती.

काँग्रेसचा इतिहास बघितला तर, भारतरत्न आंबेडकरांना देखील त्यांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे कपिल पाटील हे सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढणारे व्यक्ती आहेत, महाविकास आघाडी ही लुटारूंची आघाडी आहे. सगळे लुटारू एकत्र आले, त्यांचे नामांतर करून अलीबाबा चाळीस चोरांची आघाडी, असं करावं लागेल. मला वाटतं की लोकसभेची निवडणूक मी लढवली आहे आणि अनेक सर्वे मी बघितले आहेत. हे सर्वे म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत की महाभारतात संजयला कळत होते की, युद्धभूमीवर काय चालत आहे, तसे हे आहेत का? असा सवालही खोत यांनी उपस्थित केला.

जनता हाच मोठा सर्वे आहे, जनतेला कळते कधी कुणाला आणायचे, कधी कुणाला फसवायचे, ते फार हुशार आहेत, सर्वे म्हणजे हायफाय लोकांचा एक धंदा झाला आहे. एवढ्या जागा येणार, तेवढ्या जागा येणार, असं ते सांगतात. आता तुमच्या लक्षात येईल, नऊच्या नऊ जागा आल्य. जनतेला बरं वाईट कळतं. सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत, त्यामुळे जनता फार खूश आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला धुरंदर आणि चाणक्य हा कोण असेल, तर तो देवेंद्र फडणवीस आहे. त्या माणसाला घेरण्याच्या प्रस्थापितांनी अनेक वेळा प्रयत्न केला, पण त्या माणसाचा आम्ही अभिमन्यू होऊ दिला नाही आणि भविष्यात देखील होऊ देणार नाही, असंही खोत म्हणाले.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News