ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या टीकेला सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

राज ठाकरेंच्या टीकेला सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; अमित ठाकरेंच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली. सदा सरवणकर म्हणाले, 'निवडणुकीत मी प्रतिस्पर्धी आहे, पण राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आदराने बघतो.

Published by : shweta walge

अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची पहिली सभा पार पडली. प्रभादेवीच्या सामना प्रेसजवळ ही सभा घेण्यात आली.जे समोर येतील त्यांच्याशी लढू. पण अमितला निवडून नक्की आणणार. जे विरोधात उमेदवार उभे आहेत, त्यांची अंडीपिल्ली मी बाहेर काढू शकतो. पण मला त्या घाणीत हात घालायचा नाही. मला महाराष्ट्र घडवायचाय अस राज ठाकरे म्हणाले. यावरच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. विद्यमान आमदार सदा सरवणकर हे माघार घेतील, अशी चर्चा होती. पण, सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे.

सदा सर्वेणकर म्हणाले की, निवडणुकीत मी प्रतिस्पर्धी आहे. निवडणुकी दरम्यान अशाप्रकारे वक्तव्य नेहमी केली जात असतात. राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आदराने बघतो. बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून कधी आंदोलन केले नाही. सलग आमदार होऊन जनतेची सेवा केली तरी त्याचा समोर दुसरा येतो मग त्यावर बाळासाहेबांचा सैनिक गप्प बसत नाही.

राज ठाकरे यांना काय म्हणायचं होते ते तेच सांगतील. मी एक रींगणातला प्रतिस्पर्धी उमेदवार आहे म्हणून अस बोलत असतील. माझं राज ठाकरे यांच्याशी वैयक्तिक काहीही बोलणं झालं नाही. ते सामोपचाराने घ्या असं म्हणाले असतील तर कदाचित वरिष्ठ पातळीवर बोलणं झालं असेल. राज ठाकरे यांच्या सोबत अनेक राजकीय लोकांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत म्हणून त्यांना पाठिंबा असेल. भाजपचे सर्व पदाधिकारी माझ्या प्रचार रॅलीमध्ये फिरत आहेत अस म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मागे बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली. मग काँग्रेसमधून आमदारकीला पडली, मग पुन्हा शिवसेनेत आली. मग पुन्हा निवडणूक लढवली. मग पुन्हा एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यावर पेट्रोलपंपावर एकनाथ शिंदेंना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन बसले. कोण ही माणसं? व्यक्ती म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, हे आपले आहेत की नाही, त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार?"

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी

Vote For Amit Thakrey: अमित ठाकरे यांना मत का द्यावं?; संजय मोने यांची पोस्ट व्हायरल

Rahul Gandhi : भाजपच्या आदिवीसींविषयीच्या धोरणांवरुन राहुल गांधीची सडकून टीका

हरियाणा शिवसेना राज्यप्रमुख विक्रम सिंह यांना बिश्नोई गँगकडून धमकी

बीड/परळी: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मी पोटच्या मुलाप्रमाणे जपला - पंकजा मुंडे