काँग्रेसमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता नाना पटोले यांच्या कार्यकाळात पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे त्यांना त्वरित पदावरुन हटवावे, असे निवेदन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना दिले आहे.
माजी आमदार व काँग्रेस समितीचे सदस्य आशिष देशमुख यांनी नाना पटोल यांच्यावर आरोप केले आहेत. फेब्रवारी २०२१ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्यांकडे सोपवण्यात आली. त्यांनी सूत्र घेतल्यानंतर पक्षात उतरती कळा लागली. नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. त्याला पटोले हेच कारणीभूत आहे. असे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी लिहिले की, विधान परिषदेत सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार निवडून आले तर सभापतिपदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे. आता तर शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावर जाईल. ज्या पक्षाची पाळेमुळे शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत रोवली गेली होती, आता त्या पक्षाकडे कार्यकर्ते नाहीत, असा आरोप माजी आमदार व काँग्रेस समितीचे सदस्य आशिष देशमुख (यांनी केला आहे.