Sachin Sawant Tweet Team Lokshahi
ताज्या बातम्या

जीनाच्या कबरीवर अडवाणी गेले, भाजपने कोणती कारवाई केली? काँग्रेसचा भाजपला सवाल

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी लालकृष्ण अडवाणींचा जीनांच्या कबरीसोबतचा फोटो शेअर केला आहे. चा सवाल

Published by : Sudhir Kakde

मुंबई : ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दुल मस्लमीन (AIMIM) पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) हे काल औरंगाबादेत (Aurangabad) आले होते. ओवैसी स्कुल ऑफ एक्सलेंस या शाळेच्या भुमिपुजन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर देखील गेले होते. याठिकाणी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला वंदन करत फूल वाहिली. यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. यातच आता काँग्रेसच्या सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक फोटो शेअर करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

ओवैसींच्या कबरीवर जाण्यामुळे शिवसेनेने एमआयएमवर निशाणा साधला असून, भाजपने मात्र त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नितेश राणे, मोहित कंबोज यांच्यासह अनेक नेत्यांनी सेनेवर निशाणा साधला. त्यानंतर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली असून, सचिन सावंत यांनी एक लालकृष्ण अडवाणी यांचा एक फोटो शेअर केला आहे. "औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी गेले तर बोंब ठोकून कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपाने व भाजपाच्या पिट्टूंनी आधी 'जीना'च्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर कोणत्या IPC च्या कलमानुसार कारवाई केली? भाजपाचे सहयोगी नितीशकुमारांनाही जेलमध्ये का टाकले नाही? यांचे उत्तर द्यावे.अजून देश संविधानाने चालतो" असं मत सचिन सांवत यांनी व्यक्त केलं आहे.

सचिन सावंत यांनी केलेल्या या ट्विटमुळे भाजपची गोची निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यावरून भाजप अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता अडवाणींच्या या फोटोवर ते आता बोलणार असा सवाल निर्माण होतोय.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news